अतिवृष्टीने मराठवाड्यात उडालीय दैना
पालकमंत्री नितेश राणेंच्या मदतीच्या आवाहनाला संदीप सावंत याचा शीघ्र प्रतिसाद
कणकवली (प्रतिनिधी) : मराठवाडा भागात झालेल्या ढगफुटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुरामुळे मराठवाडयातील जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे. मराठवाडयातील शेतकरी आणि जनतेसाठी सिंधुदुर्गवासीयांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी करताच वागदे सरपंच संदीप सावंत यांनी तात्काळ आपले सरपंचपदाचे मानधन मराठवाड्यातील बांधवांच्या मदतीसाठी देऊ केले आहे. संदीप सावंत यांनी दिलेला हा मदतीचा हात जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना अनुकरणीय असा आहे.












