कणकवली शहर विकास आराखडा सादरीकरणासाठी ठाकरे शिवसेनेचे अनोखे आंदोलन

नगर रचना अधिकाऱ्यांना आराखडा यल्लो करण्यासाठी दिला पिवळा रंग आणि ब्रश

ग्रीन झोनमधील जमिनी यल्लो झोन करण्याची उपनगराध्यक्ष खात्री देत असल्याचा उमेश वाळकें चा आरोप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर विकास आराखडा सादर करण्याची शिवसेना नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग नगर रचना विभागाकडून अद्याप पर्यंत आराखडा सादर करण्यात आलेला नाही. मात्र कणकवलीचे उपनगराध्यक्ष काही व्यावसायिकांशी संपर्क करून ज्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांच्या यल्लो झोन करून देण्याचे खात्रीशीररित्या सांगत आहेत.त्यासाठीच हा आराखडा सादर करण्यास विलंब लागत आहे का? असा सवाल करत शिवसेना शहर प्रमुख उमेश वाळके यांनी शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांच्या समवेत ओरोस येथील नगर रचना विभागाच्या कार्यालयात धडक देत कणकवलीतील सर्व आराखडा यल्लो करण्यासाठी पिवळा रंग असलेला डबा व ब्रश देऊन अनोखे आंदोलन केले.

गेल्या काही महिन्यांपूर्वी शहर विकास आराखडा तयार करण्यात आला मात्र अद्याप पर्यंत तो सादर करण्यात आलेला नाही. त्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी नगर रचना विभागात भेट देऊन लवकरात लवकर शहर विकास आराखडा सादर करण्याची वारंवार मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांकडून केवळ तारखा देण्यात आल्या यातील शेवटची तारीख २४ मार्च २०२३ रोजी देण्यात आली होती मात्र त्यालाही आता एक महिना होत आला तरी देखील आराखडा अद्याप सादर केलेला नाही कणकवली नगरीचे उपनगराध्यक्ष काही व्यवसायिकांना फोन करून ज्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांच्या जमिनी येलो झोन करण्याची खात्री देत आहेत. नागवे रोड येथील एक जमीन येल्लो केल्याची माहिती मिळत आहे.आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या जमिनीबाबत वेगळी भूमिका घेऊन शहरवासीयांची फसवणूक करण्याचे काम सत्ताधारी नगरसेवक करत असल्याचा आरोप उमेश वाळके यांनी केला असून यासाठीच शहर विकास आराखडा सादर करण्यास विलंब होत आहे का?असा सवाल उमेश वाळके यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!