सुबोध गांगुर्डे सायकलद्वारे शिवरायांचे ३७० किल्ले फिरणार

खारेपाटण येथील १९८ व्या किल्याला दिली सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : एखाद्या माणसाला जर विशिष्ट ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी प्राण पणाला लावावे लागतात… इतिहासात अशी माणसं खूप सापडतील पण हल्लीच्या जगात… अशी माणसं सापडणं दुर्मिळच…

असाच एका जगावेगळा अवलिया तरुण म्हणजे सुबोध गांगुर्डे, वय – २४ वर्षे, रा. रोहा रायगड… हा तरुण नोव्हेंबर २०२२ पासून सायकलवरून संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय…
३६५ दिवसांत शिवरायांचे ३७० किल्ले फिरून त्यावरील माती संकलित करून त्यापासून शिवप्रतिमा बनवून ती जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर स्थापन करायची त्याची मनीषा आहे… त्याचबरोबर त्याचा हा एक वर्ल्ड रेकॉर्डही ठरणार आहे…

अवघ्या २४ वर्षाचा हा उच्चशिक्षित तरुण हे शिवधनुष्य पेलत नुकताच ३२ व्या दिवशी खारेपाटण किल्ला हा १९८ वा किल्ला पाहण्यासाठी खारेपाटण मध्ये शनिवार दि.१५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता दाखल झाला.त्यावेळी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव यांनी त्यांची विचारपूस करून त्यांनी किल्ले संवर्धन समितीचे खारेपाटण येथील कार्यकर्ते ऋषिकेश जाधव यांच्याशी भेट घडवून दिली… त्यानंतर त्यांना श्री जाधव यांनी खारेपाटण किल्ल्यावर नेऊन सर्वत्र फिरवून खारेपाटण किल्ल्यासंदर्भात ज्ञात असलेली ऐतिहासिक माहिती दिली.

सकाळी ८.०० वाजता अचानक आलेल्या संकटावर मात करून दुपारी ११.३० वाजता सुबोध गांगुर्डे गगनबावडयाच्या दिशेने रवाना झाला. या शिवकार्यात ऋषिकेश जाधव यांना खारीचा वाटा उचलला आला… याचा त्यांना सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

One comment

  1. सोलापुरा जिल्ह्यातील किल्ले पाहायला आला होता का आपण जर नसाल आलेले‌ तर आल्यावर फोन करावा जी
    मो.नं.९९२२२२६६५६
    ९७६६८१९३८८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!