नगराध्यक्षपदाची कोणाला लागणार लॉटरी ?

नगराध्यक्षपद आरक्षण सोडत ६ ऑक्टोबर रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत सोमवार ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेशाची स्थिती विचारात घेता, सदर आरक्षणाच्या सोडतीसाठी आपल्या पक्षांचे दोन प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहेत. पक्षाच्या अध्यक्ष, सचिव यांनी दोन प्रतिनिधी यांची शिफारस करुन आरक्षणाच्या सोडतीसाठी पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी यासह विविध राज्यातील नगरपरिषदांचे आरक्षण सोडत होणार आहे. नगरपंचायत, नगरपरिषदा संभाव्य नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे डोळे या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

error: Content is protected !!