मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील देवबाग येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूचे ४६ बॉक्स जप्त केले. या साठ्याची किंमत २ लाख २० हजार ८०० रुपये असून, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी देवबाग येथील कॅलीस डॉमिनिक डिसोजा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, सुप्रिया पवार आणि सोनाली पाटकर यांचा समावेश होता.












