गगनबावडा पाचल मार्गे परळ एस. टी. बस 15 ऑक्टोबर पासून सुरु

वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने गगनबावडा आगाराची गगनबावडा ते परळ ही एस. टी. बस दिनांक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहे. याचे आगाऊ आरक्षण एस. टी. च्या एमएसआरटीसी ॲप वरून प्रवाशांना करता येणार आहे. गगनबावडा पाचल मार्गे परळ ही एस. टी. बस गगनबावडा आगारातून गेली अनेक वर्ष सुरू होती. मात्र खाजगी आराम बसकडे प्रवाशांचा कल वाढल्यामुळे कमी भारमान मिळत असल्यामुळे ही एस. टी. बस बंद करण्याचा निर्णय गगनबावडा आगाराला घ्यावा लागला होता. आता ही एस. टी. बस सणासुदीच्या काळात उदाहरणार्थ गणपती, दिवाळी, होळी, मे महिना या गर्दीच्या काळात हंगामी बस म्हणून चालवण्यात येते. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ ऑक्टोबर पासून ५ नोव्हेंबर पर्यंत ही बस पुन्हा सुरू करण्यात येत आहे. दुपारी ३.३० वाजता गगनबावडा आगारातून ही गाडी सुटेल. ती भुईबावडा, आखवणे, भोम पुनर्वसन गावठाण, हेत, उपळे, नेर्ले पाचल ओणी मार्गे मुंबई परेल अशी जाते. तर परेल वरून सायंकाळी ५.३० वाजता सुटते. या बसचा फायदा या मार्गांवरील प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन गगनबावडा आगार प्रमुखांनी केले आहे. या बस फेरीसाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ नागप यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!