वैभववाडी (प्रतिनिधी): लोककला विकास मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम “जागर गीतांचा” जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकांस रोख १० हजार रुपये (कालकतीत कृष्णा आत्माराम साळुंखे यांच्या स्मरणार्थ विलास साळुंखे यांचकडून) द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये ( संजय जाधव), तृतीय क्रमांक ५ हजार रुपये ( कालकथीत भिवा कृष्णा कांबळे यांच्या स्मरणार्थ सुहास कांबळे ) तर लक्षवेधी गायनासाठी २ हजार रुपये शिवप्रसाद मनोज चौकेकर व उत्तेजनार्थ १ हजार रुपये( सविता जाधव यांच्या स्मरणार्थ संजय जाधव हळवल) तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच स्पर्धेत सहभागी सर्व गायकांना विलास साकेडकर यांच्याकडून सन्मानचिन्ह देण्यात आहे. या कार्यक्रमास वैभववाडी तालुका बौध्दसेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे , उपाध्यक्ष संतोष कदम, म्युनिसिपल बॕकेचे माजी संचालक बापु साळीस्तेकर, म्युनिसीपल बॕंकेचे संचालक विलास साळुंखे, लक्ष्मी प्रोडक्स राणबांबूळी मालक कल्पेश कदम, प्रा.सुषमाताई हरळूकर ( कणकवली) आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. कार्यक्रमाचे सूञसंचलन श्रीपत कांबळे व रविंद्र पवार करणार आहेत. या जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलाकाराने दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत लोककला विकास मंच कडे आपली नाव नोंदणी करावी.असे आवाहन अध्यक्ष जनीकुमार कांबळे, सरचिटणीस भरत नाईक कार्याध्यक्ष श्रीपत कांबळे यांनी केले आहे.
लोककला विकास मंचच्या वतीने बुद्ध भीम “जागर गीतांचा” या जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन
