अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक रोखणार
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा इशारा
कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल व पोलीस विभाग यांच्या डोळ्यांदेखत राजरोसपणे वाळू डंपर वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, प्रशासन मात्र हे सर्व निमुटपणे बघत आहे, या अपघातांच्या मालिकेतून प्रशासन आणखीन किती बळीं जाण्याची वाट बघणार,? सध्या जिल्ह्यात वाळू डंपराच्या बेसुमार अणि बेदरकार वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत,या अपघातामुळे सर्व सामान्य निरपराध लोकांचे नाहक बळी जात आहेत,काही कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत,काल परवा तेर्सेबाबर्डे,पिगुळी.काळसे झाराप येथे झालेले अपघात किंवा यापूर्वी झालेले अपघात हे बेजबाबदार वाळू वाहतुकीच्या डंपर चालकामुळे होत आहेत,आणि महसूल,पोलीस,आरटीओ विभाग आपली जबाबदारी असुनही हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत यांचे कारणे सर्व सामान्य जनतेला कळतील का ॽ सध्या डंपराच्या बेजबाबदार वाहतूकीमुळे जे अपघात होत आहेत ते पाहता संबंधित विभागाने आपली जनतेच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून भविष्यात अशा अपघाताचे प्रकार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्यासाठी जिल्ह्यातील महसूल आरटीओ,व पोलीस यंत्रणांनी यावर ठोस तोडगा काढण्यासाठी सर्वप्रथम कुडाळ मालवण रोड वरून कुडाळ पोस्ट ऑफिस समोरून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी डंपर वाहतूक पूर्णपणे बंद करावी, संबंधित प्रशासनाने येत्या चार दिवसांत वाळू डंपराच्या वाहतूकीवर बंदी आणावी अन्यथा पूर्व कल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वाळू वाहतूकीचे डंपर बंद करण्यासाठी आंदोलन पुकारून सर्व वाळू वाहतूकीचे डंपर रास्ता रोको करुन अडविण्यात येणार,असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केले आहे.