फाेंडाघाट येथील वसंत रेवडेकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : हवेलीनगर येथील ज्येष्ठ शिक्षक वसंत शंकर रेवडेकर (वय 98) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. फोंडाघाट पंचक्रोशीत “रेवडेकर गुरुजी” म्हणून ओळख असलेले हे ज्येष्ठ शिक्षक आपल्या कडक शिस्ती, निष्ठा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमामुळे सर्वांच्या मनात “काका” या नावाने प्रसिद्ध होते. वयाच्या २५व्या वर्षापासून लोरे, हरकुळ, फोंडा या भागातील प्राथमिक शाळांमध्ये त्यांनी शिक्षणसेवा बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. त्यांच्या निधनाने परिसरातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर फोंडाघाट बाजारपेठ काही काळ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या सहाय्य्क शिक्षिका स्नेहा रेवडेकर आणि आरोस विद्यालयातील कर्मचारी निशा रेवडेकर यांचे ते सासरे तर वेंगुर्ला आगार कर्मचारी विजय रेवडेकर यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!