मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोंड सोसायटीकडून १०,००० रुपयांचा हातभार

देवगड (प्रतिनिधी) : मोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, मर्यादित मोंड (ता. देवगड) या संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु. १०,०००/- इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

संस्थेचे अध्यक्ष गोविंद उर्फ बाबा झरकर, उपाध्यक्ष मधुकर नाटेकर तसेच संचालक मंडळातील सदस्य गणेश राणे,प्रसाद कुळकर्णी,अनाजी घाडी,नारायण उर्फ बाळा अनभवणे, भगवान मोंडे,भिकाजी तांबे,चंद्रकांत मोंडे आणि सौ. सरिता चव्हाण यांनी संस्थेच्या नफ्यातील काही भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावा, अशी सूचना संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडली होती. या प्रस्तावास सर्व सभासदांनी एकमुखाने अनुमोदन दिले.

त्यानुसार दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष बाबा झरकर, सचिव प्रभाकर बिर्जे आणि संचालक मंडळातील सदस्य यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश बोडस यांच्या उपस्थितीत सदर रकमेचा धनादेश देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

या उपक्रमामुळे सहकार क्षेत्रातून समाजाभिमुख कार्याची दिशा मिळत असल्याचे तहसीलदार पवार यांनी यावेळी नमूद केले. संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!