वैष्णवी ट्रॅव्हल्सचे मालक मनोज रामचंद्र जाधव यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ नाडकर्णी नगर तालुका. कणकवली येथील रहिवासी आणि वैष्णवी ट्रॅव्हल्स कणकवलीचे मालक मनोज जाधव यांचे वडील रामचंद्र देवाप्पा जाधव (आर. डी. जाधव गुरुजी) यांचे गुरुवारी वार्धक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८३ वर्षे होते.राजापूर तालुक्यातील तारळ येथे त्यांनी शिक्षक म्हणून दीर्घकाळ कार्य केले. विद्यार्थीप्रिय, प्रामाणिक आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख सर्वत्र होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आणि समाजकार्याची प्रेरणा घेतली. त्यांच्या निधनाने कलमठ, कणकवली व राजापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!