श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा येथे १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराने दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वा. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून नवीन खरेदी पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन तसेच ‘वाचन आहे प्रवास सुंदर’ अर्थात कथामाला मालवण शाखा व ऍड. सायली आचरेकर पुरस्कृत चोखंदळ वाचक तसेच कै. दादा ठाकूर आजीव सभासदत्व प्रदान योजनेतून प्रसाद ठाकूर यांनी संस्थेचे केलेले आजीव सभासद विद्यार्थी यांची वाचन संस्कृती वाढी संदर्भात मुलाखत आयोजित केलेली आहे. तरी सर्व वाचन प्रेमींनी ग्रंथप्रदर्शन आणि या अनोख्या मुलाखत कार्यक्रमासाठी उपस्थित राहून वाचन संस्कृती वाढीसाठी सहकार्य करावे, अशी नम्र विनंती संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी व कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!