कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे प्राथमिक केंद्रास धनंजय सावंत यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून रुग्णांना अत्यावश्यक असणारी विविध प्रकारची सुमारे १२००० रुपये किंमतीची औषधे भेट स्वरूपात देण्यात आली. सामाजिक भावनेतून धनंजय सावंत यांनी ही सर्व औषधे उपलब्ध करून दिली आहेत. सध्या व्हायरल इन्फेक्शन तसेच तापसरीचा प्रादुर्भाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना लागणारा औषधपुरवठा सावंत यांनी केला.
यावेळी वरवडे प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली वळंजू, श्री.आचरेकर, फार्मासिस्ट, विजय काका कडुलकर, सुरेश परब, संतोष राणे, तेजस पोयेकर आरोग्य केंद्र कर्मचारी, रुग्ण, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आरोग्य केंद्राच्या सुधारणा आणि विकासासाठी पातळीवर आवश्यक ते सर्व सहकार्याची ग्वाही यानिमित्ताने धनंजय सावंत यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांनी धन्यवाद व्यक्त केले.












