राज्यात विरोधात मात्र सिंधुदुर्गात भाजपा-राष्ट्रवादी साथ साथ
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आठही खरेदी विक्री संघावर भाजपच प्राबल्य असलेल्या जिल्हा संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या गळ्यात अध्यक्षपदीची माळ पडली तर भाजपचे संतोष नानचे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी विजेत्यांचे खास अभिनंदन केले आहे. तर भाजपच्या या खेळीची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे , आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतूल काळसेकर यांनी आखलेली खेळी अखेर यशस्वी झाली. भाजपचे नेते केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीचे मोठे नेते अजित पवार भाजपात जाणार, अशी राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा असताना जिल्ह्यात मात्र भाजप- राष्ट्रवादीने एकत्र येत नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात केली आहे