भाजपा नेते निलेश राणे यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पोखरण धनगरवाडी रस्त्याचं काम गेली कित्येकवर्षे अपूर्णावस्थेत असून सद्यस्थितीत झालेलं कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. या बाबत पोखरण ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यावर निलेश राणे यांनी आज मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना पोखरण येथील काम त्वरित पूर्ण करण्याच्या व निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. पोखरण धनगरवाडी रस्ता पोखरण गावातील प्रमुख जोडरस्ता असून केवळ ठेकेदाराच्या वेळकाढू धोरणामुळे हा रस्ता रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.