वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ तसेच शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा नुकताच जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच केंद्र शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ऋषिकेश जाधव, समीक्षा शेट्ये,प्राप्ती कट्टी,समृध्दी लोकरे, हरीयान, दिपाली पाटणकर,पवन कासलीवाल, कानडे,केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.खारेपाटण केंद्रशालेच्या गेल्या १० वर्षातील एकाच वर्गात सुमारे २६ मुले असलेली सर्वात मोठी बँच म्हणून इयत्ता ७ वी चा वर्ग ओळखला जायचा या वर्गाचा सदिच्छा समारंभ शाळेत पार पडला यावेळी वर्गशिक्षक संजय राऊळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.तर पालकामधून अर्चना तळगावकर,दिपाली पाटणकर व कानडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला सामूहिक भेट वस्तू दिली. तर आनुश्री तळगावकर व अन्वय शेट्ये, कानडे या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक शाळेला भेट वस्तू दिली. विद्यार्थ्यांनी देखील सदिच्छा समारंभाला सुंदर भावूक भाषणे सादर केली. तसेच शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ देखील यावेळी घेण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याना बक्षिसे मेडल,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

शाळेची इयत्ता ३ री ची विद्यार्थिनी सांची संतोष पाटणकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिला पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.तिच्या पालकांच्या वतीने शाळेला वाढदिवसानिमित्त २५००/- रुपये मदत निधी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी केंद्र शाळेचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांना नुकताच स्टार पत्रकार पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.तर शाळेचे पालक पवन कासलीवाल यांचे शाळेसाठी वाहनाचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांचा देखील विशेष सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर यांनी केले तर प्रस्ताविक शाळेचे मुख्यादयापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले शेवटी सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी यांनी मानले.












