१२ संशयित आरोपींवरती गुन्हा दाखल
देवगड (प्रतिनिधी) : खाकशी तिठा येथील चंद्रकांत गोपाळ घाडीगांवकर यांच्या राहत्या घरी आपसात संगणमत करून एकमेकांना सहाय्य करून स्वतःचे फायदा करिता धन्यवाद रिलेशन क्लब या नावे जुगाराचा अड्डा चालवून जुगार खेळत असताना देवगड पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४० हजार ८०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून १२ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात हेड कॉन्स्टेबल आशिष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५२ वा. घडली. या घटनेत रोख रक्कम ५३८०/-, ०९ जप्त मोबाईलची एकूण किंमतरु ३२,०००/- इतर साहित्य, टेबल, खुर्ची किंमत रु २७००/- एकूण ४००८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या घटनेतील संशयित आरोपी चंद्रकांत गोपाळ घाडीगावकर (वय ६०, रा. खाकशी तिठा, ता. देवगड), संदीप सखाराम सुर्वे (वय ४३, रा. किंजवडे सुर्वेवाडी, ता. देवगड), दर्शन प्रदीप भोवर (वय ३२, रा. जामसंडे विष्णूनगर, ता. देवगड), शिवाजी भिवा कोळेकर (वय ५०, रा. जामसंडे, ता. देवगड), उत्तम प्रदीप कोयंडे (वय ५०, रा. जामसंडे कट्टा, ता. देवगड), दशरथ दयानंद जावकर (वय ६९, रा. विजयदुर्ग रामेश्वर, ता. देवगड), एकनाथ आत्माराम गुरव (वय ४७, रा. जामसंडे वडांबा, ता. देवगड), राजेंद्र वसंत जाधव (वय ३५, रा. वाडा, ता. देवगड), साई गणेश कांबळी (वय ३०, रा. वाडातर, ता. देवगड), वैभव अशोक खरात (वय ३०, रा. जामसंडे कट्टा, ता. देवगड), उमेश अरुण जाधव (वय ४०, रा. वाडा मूलळबांध, ता. देवगड), नितीन घनशाम तारकर (वय ५७) यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलाम १२(अ), ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खाकशी तिठा येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती देवगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार देवगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत छापा टाकला. पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचताच सहा जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडले.
या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले साहित्य, पत्ते, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांवर देवगड पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छाप्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक, बीट अमलदार आणि स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. देवगड पोलिसांकडून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.












