हिंदु धर्मीयांनी वसुबारस सण उत्साहात साजरा करावा – हिंदुधर्माभिमानी मंडळी

आचरा (प्रतिनिधी) : अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी. या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. ह्या वर्षी वसुबारस शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी आली आहे. बसुबारास याचा अर्थ म्हणजे द्रव्य (धन). त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवस्त द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने त्या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी गाईची पाडसा सह पुजा करतात. तरी प्रत्येक हिंदु धर्मियांनी व गो-पालकांनी उत्साहात ” बसुबारास सण” उत्सव म्हणून साजरा करुया, असे आवाहन हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!