माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ब्युटी पार्लर, जुट क्राफ्ट मेकर्स आणि हेल्पर वायरमन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई च्या वतीने कौशल्य विकास अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इंडिया या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने ब्युटी पार्लर, जूट क्राफ्ट मेकर्स आणि हेल्पर वायरमन प्रशिक्षण कोर्स वर्गाचे उद्धाटन शुभारंभ करण्यात आला. या कोर्स साठी ज्युनिअर कॉलेजमधील ४० विद्यार्थिनींनी ब्युटी पार्लर व जूट क्राफ्ट मेकर्ससाठी प्रवेश घेतला तर हेल्पर वायरमनसाठी २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

सदर प्रशिक्षण हे आठवड्यातील मंगळवार,गुरुवार व शनिवार या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत दिले जाणार असून तीन महिने कालावधीचा परिपूर्ण कोर्स असणार आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे,डी.ए. सावंत, (माजी विद्यार्थी सन १९७७-७८, दहावी बॅच) यांनी सायन्स विभागाकडे शिक्षण घेत असलेल्या पाच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजनेतून प्रत्येकी रुपये ७०००/- (सात हजार रुपये) असे एकूण ३५०००/- (पत्तीस हजार रुपये) चा धनादेश प्रशालेला सुपुर्द केला. या कार्यक्रमासाठी जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे सुधीर पालव, शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, गांधीनगर, खलांतर चे सरपंच मंगेश सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून साक्षी दळवी, साै.मठकर व श्री.मेस्त्री तसेच विभाग प्रमुख म्हणून उच्च माध्यमिक विभागातील एच.बी.पटेल, चव्हाण मॅडम यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार साै.एच.बी.पटेल यांनी मानले

error: Content is protected !!