खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : सप्टेंबर २०२५ मध्ये गणित मंडळाच्या वतीने इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटण मधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले असून. या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. नुकताच शाळेच्या वतीने या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक संजय सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यामध्ये खारेपाटण हायस्कूल मधील इयत्ता ५ वी तील विद्यार्थ्यांनी सुखदा संतोष राऊत हिने ८८ टक्के गुण मिळवले. तर उत्कर्ष संगप्पा गुरव (८४ गुण), आराध्या प्रशांत सरफरे (८६ गुण), पूर्वा प्रशांत सुतार हिने (८४ गुण), काव्या संदेश चव्हाण (८४ गुण), लावण्या सतीश मोरे (६६ गुण), श्रेया श्रीकृष्ण राऊत (६६ गुण), दिशा विश्वनाथ गुरव (५२ गुण) प्राप्त करीत उज्वल यश संपादन केले.

तसेच इयत्ता आठवी मधील विद्यार्थी रेवण अनंत राऊळ याने (९४ गुण), अभिनव लक्ष्मीकांत हरियाण (९२ गुण), जय प्रशांत सुतार (८४ गुण), रितेश गोरक्षनाथ गायकवाड (७६ गुण), अनुष्का विनोद सुतार (६० गुण), यश संतोष मंगरुळे (६० गुण), आर्या निलेश करांडे (५६ गुण ) प्राप्त करीत खारेपाटण हायस्कूलच्या यशाची परंपरा कायम ठेवली.

सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी प्रशालेतील गणित शिक्षक सौ. भोर, सौ. अमृते, श्री. शिंदे, श्री. ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. तर वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत, प्रशालेतील सर्व शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!