कणकवली (प्रतिनिधी): अपघातात जखमी महिलेचा कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्मिता रामचंद्र पवार (६४, रा. वरवडे) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबतची खबर तिचा मुलगा लवेश रामचंद्र पवार याने कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. मयत स्मिता पवार व लवेश पवार हे १४ एप्रिल रोजी कणकवली ते कलमठ असा मोटारसायकलने प्रवास करत असताना अचानक बैल रस्त्यात आडवा आल्यामुळे त्यांचा अपघात झाला. या अपघातात स्मिता पवार यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर कोल्हापुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १५ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.