सामाजिक कार्यकर्ता बबली राणे, कॅरमपटू दिलीप राणे यांना आजीशोक
कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव पटेलवाडी येथील 100 वर्षीय द्रौपदी बापू राणे यांचे आज 22 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता राहत्या घरी निधन झाले. ओसरगाव मधील जुन्या पिढीतील आजी म्हणून त्या गावात सुपरिचित होत्या. 21 जानेवारी 2023 रोजी द्रौपदी आजींचा 100 व वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात कुटुंबीयांनी साजरा केला होता. कोव्हीड – 19 मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण जास्त असताना स्वतः कोरोनाबधित होऊनही द्रौपदी आजीने मोठ्या जिद्दीने कोरोनावर मात केली होती. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे , युवक कल्याण पतसंस्थेचे व्यवस्थापक, कॅरमपटू दिलीप राणे यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात सुना, नातवंडे, नातसुना, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. सर्वांशी सलोख्याचे संबंध असणाऱ्या द्रौपदी आजीच्या निधनाने ओसरगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आज सायंकाळी 5 वाजता ओसरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.