राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत रमजान ईद केली साजरी

नगरपंचायत चे सफाई कर्मचारी म्हणजे स्वच्छता दूत – अबिद नाईक

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : रमजान हा मुस्लिम बांधव धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र महिना गणला जातो.रमजान ईद चा सण हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी रमजान ईद नगरपंचायत कर्मचाऱ्यांसोबत कणकवली येथील आपल्या निवासस्थानी साजरी केली. अबिद नाईक यांनी कणकवली नगरपंचायत च्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना शीर कुर्मा देत त्यांचा आस्थेवाईकपणे पाहुणचार केला. सफाई कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सामील होत स्वतःही शिर कुर्मा चा आस्वाद घेतला. यावेळी संदीप नलावडे,अनिस नाईक,सुयोग टिकले, जावेद शेख आदी उपस्थित होते. सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी भेटवस्तू देत अबिद नाईक आणि नाईक कुटुंबियांना ईद मुबारक म्हणत ईद च्या शुभेच्छा दिल्या. अबिद नाईक यांनी घरी बोलावत ईदनिमित्त दिलेल्या कौटुंबिक सदभावनेच्या सलगीने सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कणकवली नगरपंचायत चा सफाई कर्मचारी हा शहर स्वच्छतेचा दूत आहे. या स्वच्छता दूतांचा ईद निमित्त माझ्या घरी पाहुणचार करता आला याचे समाधान असल्याची भावना अबिद नाईक यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!