केंद्रीयमंत्री राणे, आमदार नितेश राणेंनी दिला विकासनिधी
माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन
कणकवली (प्रतिनिधी) : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तिवरे गावातील ४६ लाखांच्या विकासकामांचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गावातील विकासकामांना केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यामुळे लाखोंचा निधी प्राप्त झाला आहे.
या विकासकामांत तिवरे गोसावीवाडी ते सिध्देश्वर मंदिर रस्ता स्थानिक आमदार निधी, ७ लाख रु., तिवरे विठ्ठल मंदिर ते गोसावी वाडी रस्ता २५/१५ मधून ८ लाख रु., तिवरे मुख्य रस्ता ते चर्मकारवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व संरक्षक भिंत बांधणे. समाजकल्याण आयुक्त २५ लाख रु. मंजूर, तिवरे मुख्य रस्ता ते कदमवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या फंडातून मंजूर, तिवरे धनाचीवाडी येथील गणेशघाट बांधणे १ लाख २५ हजार आदी कामांचा समावेश आहे. या कामांचे भूमिपूजन हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्ते संदीप सावंत, नयन दळवी, तिवरे सरपंच रविंद्र आंबेलकर, उपसरपंच रामचंद्र वाळवे, ग्रामपंचायत सदस्य दिक्षा कदम, मनीषा गोसावी, सुजाता गुरव तसेच गावातील ग्रामस्थ सखाराम गोसावी, शंकर राणे, रमेश गोसावी, वैभव म्हाडेश्वर, संतोष वाळवे, अनिल वाळवे, संजय कदम, दीपक कदम, सुरेश कदम, चंद्रकांत कदम, रजत कदम, शामसुंदर चव्हाण, जनार्दन कांबळे, मंगेश म्हाडेश्वर, तुषार गुरव, महेश मस्कर, दीपक गोसावी आदी उपस्थित होते.