देवगडमधील रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

देवगड (प्रतिनिधी) : फ्रेंडस् सर्कल, गुजराती नवरात्र मंडळ व सिंधु रक्तमित्र – शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ६६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. तसेच या वेळी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा ४५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन देवगड मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. सुनील आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी नगरसेवक नितीन बांदेकर, गुजराती मंडळाचे पुरुषोत्तम पटेल, विठ्ठल पटेल तसेच फ्रेंडस् सर्कल आणि सिंधू रक्तमित्र देवगड शाखेचे सदस्य उपस्थित होते.

या शिबिरात देवगड पोलीस स्थानकाचे प्रवीण सावंत, राजा पाटील, राहुल राऊत, रवींद्र महाले, प्रशांत भिवसन यांनीही रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. काही ज्येष्ठ नागरिकांनीही प्रथमच रक्तदान करून प्रेरणादायी उदाहरण घातले.

रक्तदात्यांसाठी गुजराती मंडळ व फ्रेंडस् सर्कल च्यावतीने चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती. शिबिर यशस्वी होण्यासाठी ओरोस रक्तपेढीचे डॉ. भारती ठोंबरे, प्राची परब, साई सावंत, मयुरी शिंदे, प्रथमेश घाडी, सागर सावंत, नितीन गावकर यांनी सहकार्य केले, तर मोफत नेत्र तपासणी शिबिरासाठी देवगड मेडिकल फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!