केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “इंडिया मेरीटाइम विक २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाचे उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाचा शुभारंभ भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आला. या उपक्रमामुळे देशाची सागरी शक्ती आणि ‘ब्लू इकॉनॉमी’ अधिक मजबूत आणि सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.












