ल. गो.सामंत विद्यालयाच्या प्रतिक्षा पाटीलचे वक्तृत्व स्पर्धेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : नगरवाचनालय कणकवली आयोजित बॅरिस्टर नाथ पै वक्तृत्व स्पर्धा सन 2023 ही स्पर्धा दिनांक 22-01-2023 रोजी नगरवाचनालय, कणकवली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ,मुंबई संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकूळ बुद्रुक ची इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रतिक्षा संजय पाटील हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. पारितोषिकाचे स्वरूप प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम होते.तिचे प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.या विद्यार्थिनीचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ आणि वह्या देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी कु. श्रावणी राजेंद्र चिंदरकर हिला गुलाबपुष्प आणि वही देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. ओमप्रकाश ताम्हाणेकर, कनिष्ठ महाविद्यालय समिती सदस्य सन्मा. सूर्यकांत तेली, सन्मा. श्री. सुनिल घाडीगावकर., प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मा. श्री नेवाळकर सर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मा. श्री. नेवाळकर एस. ए. यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. ओमप्रकाश ताम्हाणेकर यांनी शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे तिच्या या यशासाठी विद्यालय विश्वस्त मंडळाचे विश्वस्त सन्मा. श्री. अशोक गोविंद पारकर यांच्याकडून बक्षीस स्वरूपात 500/- रुपये जाहीर करण्यात आलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तांबे एस. एस. यांनी केले.

error: Content is protected !!