वैभववाडी (प्रतिनिधी) : गडमठ गावात मोबाईल नेटवर्कचा पूर्ण अभाव असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी व शासकीय कार्यालयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते नागेश आडके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन केली आहे. पालकमंत्री राणे यांनी या मागणीची गंभीर दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या भेटीनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर, सिद्धेश रावराणे व गडमठ गावातील ग्रामस्थ विलास कदम, राजाराम आडके, तुषार गाडी, दीपक कदम, नितीन सावंत, जयवंत साटम, देविदास नार्वेकर, सत्यवान साटम, संतोष कदम, राजेंद्र आडके, संदीप आडके, गणेश आडके, अंकुश लाड, सदानंद साटम, विजय मसुरकर खादी ग्रामस्थ उपस्थित होते.












