कार्यकारी अभियंता सर्वगौड अवजड वाहतुकीबाबत देणार अहवाल
सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) : दाजीपूर ते राधानगरी रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण सुरू असल्यामुळे फोंडाघाट मार्गे एसटी वाहतूक 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे.तथापि एसटी वाहतूक बंद असली तरी खाजगी अवजड वाहनांद्वारे फोंडाघाट मार्गे वाहतूक मागील 5 दिवसांपासून सुरू असल्याची बातमी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजने दिली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच अवघ्या तासाभरात आमदार नितेश राणे याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगौड यांना याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले. कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करत अहवाल सादर करत असल्याचे आमदार नितेश राणे यांना कळवले आहे.