कणकवली : कणकवली नगरपंचायत मधील सत्ताधारी पक्षाने मोठा गाजावाच करत चार टॉयलेट बाथरूम असलेला 86 लाखाचा महालरुपी सार्वजनिक शौचालय बांधला खरा परंतु तो महाल बांधत असताना त्याचा वापर सार्वजनिक जनता करणार आहे याचा विसर पडला होता. म्हणूनच फक्त चारच रूम चे बांधकाम केले आणि वरती अनावश्यक आलिशान रूम काढून ठेवले, ते शौचालय शासकीय कार्यालयानुसार सकाळी साडेनऊ वाजता चालू होते आणि संध्याकाळी पाच वाजता बंद होते. खरंतर हे शौचालय सकाळी पहाटे पाच वाजता चालू होऊन रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असणे आवश्यक आहे. असे न होता नगरपंचायत प्रशासन आपल्या सोयीनुसार ते उघडत आहे मुळातच कणकवली नगरपंचायत हद्दीत हे शौचालय हायवेला असल्यामुळे पर्यटक आणि स्थानिक बाजारपेठ यांना सोयीचे होईल असा गाजावाच करून मोठ्या गाजावाजात उद्घाटन करण्यात आले. शौचालयाचे बोर्ड एसटी स्टँड पासून हायवे रोड पर्यंत लावण्यात आले परंतु आज अशी परिस्थिती आहे की तिथे पाणी फक्त दोन तास उपलब्ध असते तिथे येणारा पर्यटक असेल किंवा स्थानिक व्यापारी असेल कित्येक वेळा तरी विचार न करण्याच्या परिस्थितीत अडकलेला आढळला आहे. त्यांना तेथील स्थानिक व्यापारी पाणी नेऊन देतात. मुळात 85 लाखाचा महाल बांधत असताना तिथे 24 तास पाण्याची व्यवस्था करण्याची गरज होती. ती गरज पूर्ण न करता नको तिथे अनावश्यक खर्च करण्यात आलेला आहे. अतिशय घृणाअवस्थेत आज शौचालय आहे तिथे असणारे कर्मचारी येणाऱ्या पर्यटक किंवा व्यापारी यांना आणि स्थानिक जनता यांना आज पाणी नाही आज नळ तुटला आहे चप्पल घालून घेऊ नका असे सांगत आहे. हे सुलभ शौचालयाचे ८६ लाखांचे अंदाजपत्रक केले आहे. त्या बांधकामाचा सरासरी १० हजार ७५० रुपये स्क्वेअर फूट दर होत आहे. घर बांधायला जर दिले तर २ हजार रुपये स्क्वेअर फूट मध्ये काम होत आहे. गेल्या ५ वर्षात कणकवली नगरपंचातीच्या सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. कितपत योग्य आहे हे कोणाच्या फायद्यासाठी बांधले हेच समजत नाही. ठेकेदाराचा फायदा बघून त्यावेळी ते सत्ताधाऱ्यांनी याची उभारणी करून मलई खाऊन मजेत आहे. सामान्य जनतेचे सत्ताधाऱ्यांना काही पडलेले नाही. नगरपंचायत प्रशासनाने यावर वेळीच लक्षण दिल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी टाळे ठोकण्यात येईल. आज त्या शौचालयात प्लास्टिकचे नळ लावण्यात आलेले आहेत एका मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्ती शौचालय बसल्यानंतर पाणी गेल्यामुळे व त्याची पाण्याची व्यवस्था न झाल्यामुळे त्यांनी रागाने सगळे नळ तोडून टाकले असे समजते. मागील दहा वर्षात सत्ताधारी सत्तेचा उपभोग फक्त दिखाऊपणासाठी करणार आहे का? तीच अवस्था काही महिन्यापूर्वी चालू केलेल्या उड्डाणपुलाखाली ठेवण्यात आलेल्या शौचालयाची पण आहे कणकवली शहर विस्तार होत असताना शौचालय सारखी अग्रगण्य समस्या सोडवण्यास सत्ताधारी पूर्णतः विफळ ठरत आहेत. कणकवलीचा विकास हाच आमचा ध्यास घेऊन उतरले. सत्ताधारी स्वतःचा विकास हाच आमचा विकास हे ब्रीदवाक्य घेऊन फिरवत आहेत. शेवटी एकच सांगावे लागेल जागो कणकवली कर जागो.
वार्ड क्रमांक 11 मधील 86 लाखाचा महालरुपी भाजी मार्केट सार्वजनिक सुलभ शौचालय मृत अवस्थेत – सुजित जाधव











