वैभववाडी पोलिसांची मोठी कारवाई; मोबाईल टॉवर केबल चोरीप्रकरणी टेम्पो चालकाला अटक

वैभववाडी पोलिसांची कारवाई

वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे व मांगवली येथील मोबाईल टॉवरची सुमारे 50 हजार रुपये किंमतीची केबल व इतर साहित्य चोरी प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी पुणे येथून एका टेम्पो चालकाला टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. प्रथमेश राजकुमार शिंदे वय २० वर्ष रा. कर्नाटक सध्या रा. पुणे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत बीफोरर्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फिल्ड ऑफिसर सुहास दत्ताराम चव्हाण यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी वैभववाडी पोलीस ठाणे तक्रार दिली होती.

वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे भुतेवाडी व मांगवली बौद्धवाडी येथे खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर आहेत. येथील अल्युमिनियम धातूची केबल व इतर साहित्य अशी सुमारे 50 हजार रुपयेचे किंमतीचे साहित्य दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी 24 गेले होते. याबाबत बिफोर्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फीड ऑफिसर सुहास दत्ताराम चव्हाण यांनी वैभववाडी पोलीस ठाणे तक्रार दिली होती. याबाबत वैभवाडी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता टेम्पो क्र.एम.एच 12 एन एक्स 9115 या टेम्पो साहित्य भरून घेऊन जात असताना सदर टेम्पो एका ठिकाणी रुतला होता. हा टेम्पो बाहेर काढण्यासाठी एका स्थानिक ट्रॅक्टरवाल्याने त्याला मदत केली होती. तक्रारीनंतर त्याच्या हे बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर टेम्पो चालक हा पुणे असल्याचे समजले. वैभववाडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील पोलीस कॉन्स्टेबल रणजीत सावंत, किरण मेते हरीश जायभाय यांच्या पथकाने पुणे येथे जात सदर टेम्पो व टेम्पो चालक प्रथमेश शिंदे याला ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. रविवारी त्याला न्यायालयात कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक राजन पाटील करीत आहेत.

error: Content is protected !!