विशाल परब यांच्याकडून किडनी आजारग्रस्ताला तातडीची आर्थिक मदत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या झोळंबे येथील सुरेश गवस यांना भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आर्थिक मदत दिली आहे. श्री. गवस हे गेले अनेक दिवस किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हे सहकार्य केले.

त्यांच्या वतीने भाजपा माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस आणि शिरीष नाईक यांनी मदतीची रक्कम सुरेश गवस यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त केली. या प्रसंगी महेश गवस, सुहास दळवी, मंगेश नाटेकर, रितेश गवस, संजू उसपकर, नाना देसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!