कणकवली तालुका पत्रकार संघ, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजन
कणकवली (प्रतिनिधी : कणकवली तालुका पत्रकार संघ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान हे जीवनदान’ या टॅगलाईनखाली शनिवार ८ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत तेलीआळी येथील भवानी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात जास्तीत रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी केले आहे.












