शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे यांच्या मागणीला यश

चिंदर पावणाई रस्ता खडीकरण, डांबरीकरण व त्रिंबक साटमवाडी स्मशानशेड कामांसाठी दहा लाख निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पाठपुरावा आणि मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे २५/१५ अंतर्गत चिंदर पावणाई रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे (5 लाख) व त्रिंबक साटमवाडी स्मशानशेड बांधणे (5 लाख) असा निधी मंजूर झाला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणी पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झाला आहे. याबाबत संतोष कोदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!