तर शिंदे शिवसेनेशी कोकणात संबंध तोडू

“त्या” आघाडीबाबत खासदार राणेंनी रोखठोक सुनावले

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेना आणि मविआ ची शहर विकास आघाडीबाबत वाटाघाटी सुरू असल्याबाबत खासदार नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता तसे झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात भाजपा शिंदे शिवसेनेशी संबंध तोडू असे रोखठोक सांगितले. माजी आमदार राजन तेली यांच्या पुढाकाराने कणकवली नगरपंचायत निवडणूकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्या युतीने कणकवली शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. याबाबत विचारले असता खासदार राणे यांनी तसे झाल्यास दक्षिण कोकणात शिंदे शिवसेनेसोबत चे संबंध भाजपा तोडेल असा इशाराच दिला. त्यामुळे शहर विकास आघाडी सुरुवात होण्याआधीच खासदार राणेंनी या संभाव्य आघाडीला सुरुंग लावला आहे. त्यामुळे खासदार राणे यांच्या या इशाऱ्याने कणकवली नगरपंचायतमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार नाही, शहर विकास आघाडी होणार नाही हेही स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!