जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडून “प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा”

जिल्ह्यातील सर्व शाळांचा सहभाग अपेक्षित

ओरोस (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) व विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये “प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळानी, तसेच जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख स्वच्छ सुंदर जिल्हा तसेच पर्यटन जिल्हा म्हणुन आहे. यामुळेच पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील रस्त्यावर प्लास्टिक बॉटल, रॅपर असा प्लास्टिक कचरा दिसुन येतो. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आपला सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ व सुंदर दिसावा या करीता जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन “प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा” उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्हातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळाच्या माध्यमातुन गावातील प्लॉस्टिक बॉटलचा कचरा एकत्र करण्यात येणार आहे. या स्पर्धेत तालुक्यात सर्वात जास्त प्लास्टिक बॉटल गोळा करणाऱ्या उत्कृष्ट शाळाचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शाळेमध्ये सर्वात जास्त प्लास्टिक बॉटल गोळा करणाऱ्या विद्यार्थ्याचा हि सन्मान जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे.

“प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धाच्या” दरम्यान जमा होणारे प्लास्टिक शिवप्रतिज्ञा बहुद्देशिय सेवाभावी संस्था, मिरज, जि. सागली यांच्या माध्यमातुन गोळा करुन पुढिल प्रक्रिया करण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यामध्ये प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळानी सहभाग नोंदवावा अशा सुचना देण्यात आल्या आहे. तसेच या कार्यक्रमांत जिल्हा वासियांनी सहभाग घेतल्यास पहिला पर्यटन जिल्हा, पहिला स्वच्छ जिल्हा त्याप्रमाणे पहिला प्लास्टिक बंद म्हणुन आपला जिल्हा नव्याने ओळख निर्माण करु शकेल असा विश्वास यावेळी रविंद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!