कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुक प्रचारात भाजपाने आघाडी घेतली असून माजी नगराध्यक्ष तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज प्रभाग तीन मध्ये डोअर टू डोअर प्रचार केला. आज सकाळी कणकवली चे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि भाजपाच्या सर्व इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यानी नगरपंचायत निवडणुकीचा नारळ फोडला. त्यानंतर प्रभाग तीन मध्ये समीर नलावडे यांनी आज प्रचार फेरी काढली. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन भाजपाचा प्रचार सुरू केला आहे. एकीकडे भाजपाने प्रचारात मुसंडी मारायला सुरुवात केली असली तरी दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र आघाडी की स्वबळ यातच गुंतून आहे.
कणकवलीत समीर नलावडेंचा डोअर टू डोअर प्रचार सुरू











