कुडाळ (प्रतिनिधी) : शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ६वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परीक्षा शनिवार १३ डिसेंबरला होणार आहे. ऑनलाईन प्रवेश पत्रे काढण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या प्रवेशासाठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard संकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी 02363-242713 या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा, असे प्राचार्य अशोक कांबळे (9403352958) व परीक्षा प्रमुख जे. बी. पाटील व एस पी. हिरेमठ यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.
नवोदय विद्यालयची १३ डिसेंबर रोजी प्रवेश परीक्षा












