जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म हा बौद्ध धर्म आहे- एस एल वानखडे
खारेपाटण ( प्रतिनिधी) : फ्रेंच क्रांती पेक्षाही बौध्द धर्माची क्रांती जगात मोठी क्रांती होती. विज्ञानावर आधारित व परिवर्तनवादी असलेला बौद्ध धर्म या अनुशंगाने भारत देशात भ. बुद्धांची चळवळ व त्यांची विचारधारा सुमारे १२०० वर्षे अस्तित्वात होती.म्हणून या जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणून बौद्ध धर्म म्हणून ओळखला जातो.”असे भावपूर्ण उदगार पुणे भोसरी येथील धम्म प्रचारक आयु.एस एल वानखडे यांनी राजापूर तालुका बौध्दजन संघ गट क्र.७ च्या वतीने जुवाठी बौद्धवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या “धम्म प्रबोधन” कार्यक्रमात उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना काढले.
राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्र.७ चे अध्यक्ष श्री.उमाकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सचिव श्री संतोष कांबळे,बौद्धजन विकास मंडळ जुवाठी ग्रामीण शाखेचे अध्यक्ष श्री.कमलाकर जोशी,पत्रकार व सामजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर,देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजुदुर्ग विभागाचे बौद्धचार्य श्री किशोर कांबळे,राजापूर तालुका संघाचे बौद्धचार्य श्री महेंद्र पवार,श्री सुधीर सकपाळ गुरूजी,सौ स्वाती जाधव,निलेश पवार,किरण कांबळे,मनोहर कदम,संदेश कांबळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ.गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर सामुदायिक धम्म पूजा पाठ घेण्यात आला. स्वागताध्यक्ष कमलाकर जोशी यांच्या शुभहस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.या कार्यक्रमाला पंचशील महिला मंडळ जुवाठी ग्रामीण शाखेच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री वानखडे पुढे म्हणाले - डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,मी शरीराने मृत झालो असलो. तरी जोपर्यंत या देशात संविधान जिवंत आहे.तोपर्यंत मी देखील तुमच्यात विचारातून जिवंत आहे त्यामुळे "भारतीय संविधान हे जिवंत ठेवायचे असेल व बाबासाहेब यांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर आपल्याला सर्वांना जागरूकतेने काम केले पाहिजे.असे ते म्हणाले.
तसेच भ. बुद्धाची धम्म चळवळ सद्या लयास गेली असून बुंद्धाच्या काळात कोणतीही प्रसाराची साधने उपलब्ध नसताना बौद्ध भिखुच्या माध्यमातून पायी चालत चळवळ जिवंत ठेवली.मात्र बाबसाहेब यांनी १९५६ ला या बौद्ध धर्माला पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त करून दिली.मात्र दुर्दैवाने या चळवळीचा नाश होऊ नये म्हणून प्रत्यक्ष घराघरात धम्म प्रचारक तयार व्हायला पाहिजेत.असे प्रतिपादन एस एल वानखडे यांनी शेवटी धम्म प्रबोधन कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाचे आयोजन राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्र.७ व बौद्धजन विकास मंडळ जुवाठी ग्रामीण/मुंबई व पंचशील महिला मंडळ जुवाठी यांच्या वतीने करण्यात आले होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन पवार (म्हावळूंगे) यांनी केले तर प्रास्ताविक व आभार सचिव - श्री संतोष कांबळे यांनी केले.