देवगड ( प्रतिनिधी) : देवगड येथील शेठ म.म हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या स्थानीय समितीचे सदस्य व माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक संजीव राऊत ,पर्यवेक्षक सुनील घस्ती , मार्गदर्शक सुरेंद्र वारंग (मालवण) ,सर्व क्रीडा विषय शिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘ विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी खेळाचे महत्व जाणून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळावे, असे मत चंद्रकांत शिंगाडे यांनी व्यक्त केले. मार्गदर्शक सुरेद्र वारंग यांनी विद्यार्थ्यांना हॉलीबॉल खेळातील कौशल्य प्रात्यक्षिकासह दोन दिवस मार्गदर्शन केले या शिबिराचा लाभ शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी घेतला. या शिबिराचे आयोजन शाळेतील क्रीडा विषय शिक्षक समितीमार्फत करण्यात आले होते. भविष्यात देखील विविध खेळांचे शिबिरे घेण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन ज्ञानेश्वर कुंभरे यांनी तर प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी मानले.













