मिलिंद कांबळे यांना “राज्यस्तरीय सम्यक कला भूषण पुरस्कार” जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावचे सुपुत्र तथा पत्रकार,साहित्यिक,कवी, लेखक,समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भिकाजी कांबळे (चिंचवलकर) यांना नुकताच सम्यक कोकण कला संस्था (रजि.) मुंबई,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित “राज्यस्तरीय सम्यक कला भूषण पुरस्कार – २०२५ जाहीर झाला असून त्यांच्या या पुरस्कार निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

सम्यक कोकण कला संस्था या संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित संस्थेचा वर्धापन दीन कार्यक्रम दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन दादर,मुंबई येथे सायं.६.०० वा. आयोजित करण्यात आलेला असून सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत मिलिंद कांबळे यांचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

बुद्ध,शिव,फुले,शाहू आंबेडकरी बहुजनाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी श्री मिलिंद कांबळे हे समाज जनजागृती करून आपल्या परखड लेखणीतून प्रबोधनाचे कार्य करत आहेत.आज पर्यंत त्यांना विविध सामाजिक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या या कार्याची दखल सम्यक कोकण कला संस्था महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन त्यांना राज्यस्तरीय सम्यक कलभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

error: Content is protected !!