कणकवली (प्रतिनिधी) : हृदयविकारासंबंधित तक्रारी वाढत असताना रुग्णांना योग्य निदान मिळावे यासाठी माधवबाग कणकवली शाखेतर्फे मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ नोव्हेंबर, ते २३ नोव्हेंबर, २०२५ यादरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, माधवबागच्या कणकवली येथील तपासणी केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे.
दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज येणे यासारखी हृदयविकारांची लक्षणे जाणवत असलेल्या तसेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेल्या वा डॉक्टरांनी सल्ला दिलेल्या रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरात ईसीजी तपासणी, डॉक्टर कन्सल्टेशन, रँडम शुगर चेकअप, ट्रेडमिल टेस्ट (TMT) यासारखी सामान्यतः ९९९ रुपये शुल्क असलेली ही संपूर्ण तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, यासाठी ९३७३१८३८८८ या नंबरवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. हृदयविकाराचे अचूक निदान व योग्य उपचारासाठी रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












