मंत्री उदय सामंत,आम. निलेश राणे यांच्या भाषणांनी व वागणुकीने महाविकास आघाडीतील कार्यकर्ते प्रभावित !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या कणकवली येथील कॉर्नर प्रचार सभेस, फोंडाघाट मधील असंख्य कार्यकर्ते गेले होते. तेथील उपस्थिती आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे आणि आमदार निलेश राणे व मंत्री उदय सामंत यांच्या संभाषणाने ते प्रभावित झाले. कार्यकर्त्याविषयी त्यांनी उघडपणे केलेल्या आपुलकीच्या वक्तव्यातून नवीन नेतृत्वाचा उदय होत असल्याची भावना सुरेश टक्के यांनी व्यक्त केली. तर फोंडाघाट सारख्या विकसनशील गावासाठी सुद्धा अशा भविष्याभिमुख आणि दडपशाही मुक्त तसेच भ्रष्टाचार मुक्त नेतृत्वाची गरज असल्याचे शामराव भुवड यांनी स्पष्ट केले…
यावेळी फोंडाघाट मधील बागायतदार आणि शेतकऱ्यांचे वतीने इ पिक सध्या होत नसल्याबद्दल व ॲप मध्ये एरर येत असल्याबद्दल तसेच शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २५ असल्याने व शासकीय योजनांपासून सर्वजण वंचित राहण्याची भीती व्यक्त होत असल्याने, इ पिक चालू वर्षी स्थगित करावी, याबद्दल आमदार निलेश राणे यांना फोंडाघाट वासिया तर्फे निवेदन देण्यात आले. त्यांनी सुद्धा आपुलकीने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले…













