पालकमंत्री नितेश राणेंचा राजघराण्याच्या योगदानाची परतफेड करण्याचा संदेश
सावंतवाडी (प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्शभुमिवर भारतीय जनता पार्टीची प्रचारसभा आज सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आयोजित केली हाेती.यावेळी प्रचार सभेस पालकमंत्री नितेश राणे यांंनी उपस्थित राहून संबोधित केले.सावंतवाडी नगर परिषदेची ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची व स्वाभिमानाची निवडणूक आहे. सावंतवाडी शहराशी भोसले राजघराण्याचं अतुट नातं आहे. शहराला खरी ओळख ही या राजघराण्यानेच दिली आहे. त्यामुळे आज राजघराण्याच्या त्या योगदानाची परतफेड करण्याची वेळ आहे. त्यामुळे श्रद्धाराजे भोसलेंसह सर्व भाजपा नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, विशाल परब यांसह सावंतवाडी नगरसेवक पदाचे उमेदवार व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












