खारेपाटण जि. प. केंद्र शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ संपन्न

“विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासाबरोबर खेळलाही महत्व दिले पाहिजे.” – प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : “खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असून शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपले पारंपरिक खेळांची जपणूक करून त्यांना महत्व दिले पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी खारेपाटण येथे केंद्रस्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव स्पर्धेच्या उद्घघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना काढले.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जि. प. पूर्ण प्राथ. केंद्र शाळा खारेपाटण नं. १ येथे खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घघाटन मंगळावर दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाल जाधव, खारेपाटण शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, प्रियंका गुरव, प्रांजल बाबरदेसाई, निधी शिंदे, संध्या पोरे, उमेश गुरव, खारेपाटण उर्दू शाळेच्या अध्यक्षा नसीमा नाईक, रामेश्वर नगर खारेपाटण शाळेच्या अध्यक्षा नर्गिस मुलानी, जि. प. टाकेवाडी शाळेच्या अध्यक्षा स्वाती गुरव, नाडगीवे जि. प.शाळेच्या अध्यक्ष सौ. पगारे, विश्वजित जाधव, वायगणी शाळेचे अध्यक्ष एकनाथ बाणे, खारेपाटण केंद्र शाळा नं. १ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, नडगीवे शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका सौ. पाटकर, रामेश्वर नगर खारेपाटण शिक्षक श्री. धुळप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख गोपाल जाधव यांचे हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक प्रतिज्ञा देऊन क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडांगणावर खो-खो, कबड्डी, उंच उडी, लांब उडी गोळा फेक, १००-२०० मिटर धावणे तसेच फोर रिले स्पर्धा आणि ज्ञानी मी होणार स्पर्धा, समूह गान व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी संतोष पाटणकर यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम खेळाचे प्रदर्शन करून आपल्या गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल करा असे सांगून संपूर्ण क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण क्रीडा सर्धेसाठी क्रीडा प्रमुख म्हणून म्हणून संदीप कदम तर उपक्रिडाप्रमुख राजेश तेरवणकर यांनी काम पाहिले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी परब यांनी केले. तर सर्वांचे आभार संदीप कदम यांनी मानले. यावेळी खारेपाटण केंद्रातील ९ शाळांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!