कुडासे येथील “नकलाकार” विजय फाले यांना महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्काराने आले गौरविण्यात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे या संस्थेकडून कुडासे येथील “नकलाकार” विजय फाले यांना महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथील आर्ट बिट्स फाऊंडेशन कडून एकूण सहा विभागात हे पुरस्कार दिले जातात. गेली २१ वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत अभिनय, नृत्य, नकलाकार आणि लोककला अशा सर्वच कला क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करत आहे. या पुरस्कारांसाठी या संस्थेने १५ मे २०२२ ते २१ जुलै २०२२ या कालावधीत अर्ज मागविले होते. त्यांनतर अर्जातून पुरस्कार प्राप्त कलाकारांची निवड करण्यात आली आहे. “नकलाकार” या कला विभागात विजय फाले यांना हा महाराष्ट्र युवा कलाकार गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांना या पूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गोवा, कर्नाटक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर बेळगाव आदी ठिकाणी त्यांच्या कलेचे कार्यक्रम झाले आहेत. गोवा येथे खासगी नोकरी करत असताना कला क्षेत्रात काम करण्यासाठी माझ्या कुटुंबाचे मिळणारे सहकार्य हीच आपली ताकद आहे. तर मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन व मित्रमंडळींनी दिली प्रेरणा आणि साथ यामुळे आपल्याला या क्षेत्रात यश मिळत आहे.

error: Content is protected !!