भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्यामाध्यमातून प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ श्री रवळनाध मंदिर ओरोस येथे करण्यात आला

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक 14 मे रोजी होणार असून या निवडणुकीत भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व राहिल असा विश्वास भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल प्रमुख राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.


यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अनंत राणे, जिल्हासरचिटणीस सुहास सावंत, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हासरचिटणीस शिवाजी गावीत, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र जोईल, जिल्हासरचिटणीस दिलीप मस्के, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघटनेचे किशोर कदम, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ महाराष्ट्रचे दत्तराज फोंडेकर आदी उपस्थित होते.


सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 14 मे रोजी जाहिर झाली असून या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर केंद्रप्रमुख सभा, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब महासंघ, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ या प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्यामाध्यमातून निवडणूक लढवणार आहेत. या पॅनेलचे पॅनेल प्रमुख म्हणून शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी निवडणूक होणार असून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे तालुका सर्वसाधारण क्षेत्र उमेदवार कुडाळ विजय सावंत, कणकवली श्रीकृष्ण कांबळी, मालवण मंगेश कांबळी, वेंगुर्ला सिताराम लांबर, दोडामार्ग महेश काळे, सावंतवाडी गोविंद शेर्लेकर, देवगड संतोष राणे, वैभववाडी संतोष मोरे हे उमेदवार निश्चित करण्यात आले असून जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र पुरूष नारायण नाईक व संतोष राणे, जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र महिला सौ ऋतुजा जंगले व सौ समिक्षा परब, जिल्हा इतरमागास प्रवर्ग महेंद्र पावसकर, जिल्हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग चंद्रसेन पाताडे, जिल्हा भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्ग संजय पवार हे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत, असे यावेळी कोरगावकर म्हणाले.


भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ श्री देव रवळनाध मंदिर ओरोस यैथे करण्यात आली.यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते.गेली 25 वर्षे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे वर्चस्व प्राथमिक शिक्षक पतपेढीवर राहिलेले असून विद्यमान संचालक मंडळाने विविध सभासद हिताच्या योजना राबवून स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे संस्थैला 2022-23 या आर्थिक वर्षांत निव्वळ साडेसहा कोटीचा नफा झाला आहे. विरोधकांच्या कोणत्याही भूलथांपांना बळी न पडता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सभासदांनी बहुमताने भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्या सर्वच्या सर्व 15 उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे असे, आवाहन राजन कोरगावकर यांनी केले.

error: Content is protected !!