बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ चे वर्चस्व

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या वतीने नुकत्याच खारेपाटण येथे घेण्यात आलेल्या बाल, कला, क्रीडा, समूह गान, समूह नृत्य व ज्ञानी मी होणार केंद्र स्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण केंद्र शाळा नं. १ च्या शालेय विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक अशा विविध खेळांमध्ये यश संपादन करून चॅम्पियन शिप प्राप्त करत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ च्या मैदानावर पार पडलेल्या शालेय केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता. या क्रीडा स्पर्धामध्ये खारेपाटण केंद्रातील एकूण ९ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये खारेपाटण केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत पुढील होणाऱ्या प्रभाग स्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.

लहान गट स्पर्धेमध्ये यश मिळविलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :- ५० मीटर धावणे – अनन्या आनंद चौरे (द्वितीय), लांब उडी – श्रवण सूरज मोरे (द्वितीय), उंच उडी – हर्ष कानडे (प्रथम), प्रवीण मिनके व वैष्णवी निमणकर (द्वितीय) तर सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो-खो, मुले-मुलगी या दोन्ही संघानी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर ५०/४ रिले सर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

याबरोबरच मोठ्या गटामध्ये १०० मीटर धावणे :- सुप्रबुद्ध संदेश पाटणकर (प्रथम) तर मुलीमध्ये सांची संतोष पाटणकर (द्वितीय), २०० मीटर धावणे – अथर्व लाड (प्रथम), सार्थक पोरे (द्वितीय), तर मुलीमध्ये शर्वरी अतुल देवस्थळी (द्वितीय), लांब उडी – अथर्व लाड (प्रथम) जय धामापूरकर (द्वितीय) तर मुलीमध्ये जान्हवी राजेश जाधव (द्वितीय), उंच उडी – सार्थक हर्षल पोरे (प्रथम) प्रेम सदू मिनके (द्वितीय) तर मुलीमध्ये स्वरा संदीप तोडकर (प्रथम), गोळगेक – हेमंत राजू गारगुंडे (प्रथम), सम्यक संदीप पाटणकर (द्वितीय) तर मुलीमध्ये वैष्णवी सुरेश कोळसुलकर (प्रथम) याबरोबरच कबड्डी आणि खो-खो या खेळामध्ये मुलगे व मुली या दोन्ही संघानी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर समूह नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात देखील खारेपाटण केंद्र शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या तळेरे प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झाली असून या संपूर्ण किडा स्पर्धा जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं. १ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धेत संदीप कदम व राजेश तेरवणकर यांनी क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहिले. तर क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, व्यवस्थापन समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदय गुरुप्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मंगेश गुरव, प्रियंका गुरव यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील सर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!