रविवारी रात्री गोठ्यात बांधलेल्या पाडयाचा पाडला फडशा
वनविभागाने केला पंचनामा
देवगड :(प्रतिनिधी): कुणकवणमध्ये बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या पाड्याचा फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे यामुळे देवगड तालुक्यात बिबट्याची दहशत सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुणकवण येथील महेश अनंत गुरव यांनी आपल्या घराशेजारीच असलेल्या गोठ्यामध्ये रविवारी रात्री पाड्याला बांधून ठेवले होते.या पाड्यावर रात्रीच बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला.सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून घटना सांगीतली यानंतर देवगड वनपाल सारीक फकीर यांनी घटनास्थळी येवून घटनेचा पंचनामा केला.देवगड तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत असून खाद्यांच्या शोधार्थ बाहेर पडल्या बिबट्या रस्त्याने मार्गक्रमण करीत असताना वाहनचालकांवरही हल्ला करण्याची घटना आठ दिवसापुर्वी पडेल येथे घडली होती.यानंतर आठ दिवसांनीच कुणकवण येथील महेश अनंत गुरव यांच्या पाड्याचा फडशा पाडल्याने बिबट्याचा या मुक्त संचाराची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.












