खारेपाटण येथे भरला गावठी बाजार

बचत गटाच्या महिलांचे विविध वस्तूंचे स्टॉल ठरले ग्राहकांचे आकर्षण

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या शहरात ब्रिटिशकालीन बाजारपेठेत घोडेपाथर बंदर येथे नुकताच गावठी वस्तूच्या बाजारचे उद्घाटन नुकतेच रविवारी खारेपाटण येथील प्रसिद्ध डॉक्टर उमेश बालन यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या गावठी बाजारात खारेपाटण येथील बचत गटाच्या महिलांनी लावलेले विविध स्टॉल ग्राहकांचे आकर्षण ठरले होते. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, वायगणी सरपंच अस्मि लाड,खारेपाटण ग्रा.प.सदस्या धनश्री ढेकणे, मनाली होनाळे,सी आर पी आस्था पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भगातील महिलांना त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून निर्माण केलेले विविध गावठी पदार्थ ग्राहकपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने तसेच बचत गट निर्मित खाद्य पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे गावठी बाजार भरविण्यात आला असल्याचे खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी यावेळी सांगितले. आपली लोप पावलेल्या खाद्य संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे गावठी बाजार भरविणे काळाची गरज असून यानिमित्ताने महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होऊन महिला सक्षमीकरण कार्यास गती मिळेल असे भावपूर्ण उद्धगार शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांनी गावठी बाजार उद्घाघाटन प्रसंगी काढले. खारेपाटण येथे भरविण्यात आलेल्या या गावठी आठवडा बाजारात खारेपाटण मधील हिरकणी स्वयंसहय्यता महीला समूह बचत गट टाकेवाडी (हस्तकला), ममता विजय सुतार, टाकेवाडी (लाकडी घरघुती वस्तू) साक्षी गजानन आंबेरकर(कुळीथ पीठ,फणसाचे वेपर,काळीमिरी), अनिता अशोक पाटणकर (पुरणपोळी),साजराई समूह बचत गट (मेंदुवडा), योगिता उमेश राऊत( साखरोळी), अमृता पिसे (खोबरावडी), अस्मिता ढेकणे(चकली,लाडू, भेळ) आदी ९ बचत गटानी व महिलांनी विविध पदार्थ वस्तूंचे स्टॉल मांडले होते. खारेपाटण मध्ये दर रविवारी हा गावठी बाजार भरविण्यात येणार असून या गावठी बाजाराला खारेपाटण व आजूबाजूच्या गावातील जास्तीत जास्त नागरिकांना भेट देऊन तेथील वस्तू व पदार्थांचा लाभ घ्यावा.असे आवाहन खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!